मध्य रेल्वेच्या मार्गांवर साचणाऱ्या कचऱ्यास प्रवाशांसह या मार्गांवरील वसाहतीही ‘हातभार’ लावत असतात. मध्य रेल्वेतर्फे हा कचरा उचलला जात असला तरीही त्याचे प्रमाण कमी झालेले नाही. या कचऱ्याचा निपटारा करण्यासाठी रेल्वेतर्फे ब्लॉकही घेतला गेला आहे. गेल्या सहा महिन्यांत सुमारे 15 हजार क्युबिक मीटर कचरा उचलण्यात आला. हा कचरा एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की 15 बाय 10 मीटरच्या किमान 30 मजली उंच इमारतीएवढे त्याचे प्रमाण होते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मध्य रेल्वेवरील रुळांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचतो. त्यामुळे पावसाळ्यातही रेल्वेचा गोंधळ निर्माण होतो. या कचऱ्यास प्रवाशांप्रमाणेच रुळांशेजारी वसाहतीतून येणारा कचराही कारणीभूत ठरला आहे. बुधवारी मालगाडीचा डबा घसरल्यानंतर पारसिक बोगद्यात जमा झालेला कचरा त्यास जबाबदार आहे का, याचा तपास केला जात आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews